विजयध्वज उभारला । तुमचा मिरवला तिहीं लोकीं ॥१॥ करितां दासाचें धांवणे । एकाचि स्मरणें नामाच्या ॥२॥ संतहि बडिवार वर्णिती । हाचि श्रीपती नित्यानीं ॥३॥ निळा म्हणे ऐकोनि वचनें । धरिला मनें विश्वास ॥४॥