वाचा गुणीं लांचावली – संत निळोबाराय अभंग – ६९५
वाचा गुणीं लांचावली ।
मति विस्तारें फांकली ॥१॥
ऐशी केली तुम्ही दया ।
कृपाळूवा पंढरीराया ॥२॥
सर्वकाळ ध्यानीं मनीं ।
रुप राहिलें चिंतनीं ॥३॥
निळा म्हणे भूक तहान ।
गेली ठायीचि हरपोन ॥४॥
वाचा गुणीं लांचावली ।
मति विस्तारें फांकली ॥१॥
ऐशी केली तुम्ही दया ।
कृपाळूवा पंढरीराया ॥२॥
सर्वकाळ ध्यानीं मनीं ।
रुप राहिलें चिंतनीं ॥३॥
निळा म्हणे भूक तहान ।
गेली ठायीचि हरपोन ॥४॥