रुप राहिलें चिंतन – संत निळोबाराय अभंग – ६९४

रुप राहिलें चिंतन – संत निळोबाराय अभंग – ६९४

रुप राहिलें चिंतन ।
सर्वकाळ ध्यानीं मनीं ॥१॥
वाचा गुणीं लांचावली ।
मती विस्तारें फांकली ॥२॥
ऐसी केली तुम्ही दया ।
कृपाळुवा पंढरीराया ॥३॥
निळा म्हणे भूक तहान ।
गेली ठायीं हरपोन ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रुप राहिलें चिंतन – संत निळोबाराय अभंग – ६९४