यावरी बोलती गोवळ – संत निळोबाराय अभंग – ६९३
यावरी बोलती गोवळ ।
तूंचि सकळ जाणतां ॥१॥
कैसें जाणें येणें आम्हां ।
पुरुषोत्तमा तुजवीण ॥२॥
धन वित्त आमुचें गोत ।
तुंचि सतत जीवप्राण ॥३॥
निळा म्हणे वरदळ बोली ।
केली साहिली पाहिजे ते ॥४॥
यावरी बोलती गोवळ ।
तूंचि सकळ जाणतां ॥१॥
कैसें जाणें येणें आम्हां ।
पुरुषोत्तमा तुजवीण ॥२॥
धन वित्त आमुचें गोत ।
तुंचि सतत जीवप्राण ॥३॥
निळा म्हणे वरदळ बोली ।
केली साहिली पाहिजे ते ॥४॥