म्हणोनियां विटलें मन – संत निळोबाराय अभंग – ६९२
म्हणोनियां विटलें मन ।
आलें परतोन माघारिया ॥१॥
तुमचिया नामस्मरणीं ।
रतलें चरणी सुखावलें ॥२॥
नाहीं येथे घातपात ।
पावती निभ्रांत निजठायां ॥३॥
निळा म्हणे ऐसिया आशा ।
राहिलें भरंवसा मानूनियां ॥४॥
म्हणोनियां विटलें मन ।
आलें परतोन माघारिया ॥१॥
तुमचिया नामस्मरणीं ।
रतलें चरणी सुखावलें ॥२॥
नाहीं येथे घातपात ।
पावती निभ्रांत निजठायां ॥३॥
निळा म्हणे ऐसिया आशा ।
राहिलें भरंवसा मानूनियां ॥४॥