मूढमती परि मी वाचें । नाम तुमचें उच्चारीं ॥१॥ नेणें कांहीं न कळे हित । परि मी भक्त म्हणवितों ॥२॥ अज्ञानचि परि मी दास । धरिली कास न सोडीं ॥३॥ निळा म्हणे भलत्या परि । अंगिकारी विठोबा ॥४॥