मूढमती परि मी वाचें – संत निळोबाराय अभंग – ६९१
मूढमती परि मी वाचें ।
नाम तुमचें उच्चारीं ॥१॥
नेणें कांहीं न कळे हित ।
परि मी भक्त म्हणवितों ॥२॥
अज्ञानचि परि मी दास ।
धरिली कास न सोडीं ॥३॥
निळा म्हणे भलत्या परि ।
अंगिकारी विठोबा ॥४॥
मूढमती परि मी वाचें ।
नाम तुमचें उच्चारीं ॥१॥
नेणें कांहीं न कळे हित ।
परि मी भक्त म्हणवितों ॥२॥
अज्ञानचि परि मी दास ।
धरिली कास न सोडीं ॥३॥
निळा म्हणे भलत्या परि ।
अंगिकारी विठोबा ॥४॥