यज्ञोपवित सांडिलें दुरी – संत निळोबाराय अभंग ६९
यज्ञोपवित सांडिलें दुरी ।
शिखासूत्राची बोहरी ।
करुनियां मोहरी करीं ।
कांठी कांवळा गांजिवा ॥१॥
उफराटी पडदणीं खेविली टिरी ।
सूक्ष्म शेंडी बोडक्यावरी ।
दृष्टी चोरुनियां माझारी ।
माजी गोवळांच्या नाचतो ॥२॥
येऊनियां कृष्णाजवळा ।
मुख पसरी इच्छूनि कवळा ।
तंव हा दावूनियां आणिका गोवळां ।
मुखीं भरी स्वानंदे ॥३॥
सर्वांग देखणा श्रीहरी ।
व्यापक सकळांचे अंतरी ।
ब्रम्हा पाडियला फेरी ।
नेदी शितंबोटी आतळों ॥४॥
म्हणे ठकूनियां घेऊ आला ।
कैसेचि अधिकारी तो झाला ।
नव्हे सोंगादिन मी दादुला ।
भंल कोणचा सांगाती ॥५॥
मग म्हणे वांकुल्या दावा यासी ।
न पवे भाग कृत्रिमवेषी ।
तुम्ही सेवारे सावकाशी ।
आजिचिया सुखासी पार नाहीं ॥६॥
ऐसे जेविले समस्त ।
ब्रम्हा राहिला टोकत ।
निळा म्हणे हा हदगत ।
जाणे सकळां अंतरीचें ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
यज्ञोपवित सांडिलें दुरी – संत निळोबाराय अभंग ६९