निवेदिलें पायांपाशीं । जें जें मानसीं होतें तें ॥१॥ आतां उचित तैसें करा । आम्ही तों ससारा आचवलों ॥२॥ काय नाहीं तुमच्या हातीं । वचनीं तिष्ठती महासिध्दी ॥३॥ निळा म्हणे तुमच्या संगें । पांडुरंगें वर्तिजे ॥४॥