निवेदिलें पायांपाशीं – संत निळोबाराय अभंग – ६८९
निवेदिलें पायांपाशीं ।
जें जें मानसीं होतें तें ॥१॥
आतां उचित तैसें करा ।
आम्ही तों ससारा आचवलों ॥२॥
काय नाहीं तुमच्या हातीं ।
वचनीं तिष्ठती महासिध्दी ॥३॥
निळा म्हणे तुमच्या संगें ।
पांडुरंगें वर्तिजे ॥४॥