निंदील कोणी मज तो निंदूं । अथवा स्तुतिवादु करोत सुखें ॥१॥ परि मी गाईन पंढरीनाथा । गुण तत्त्वतां तुमचेचि ॥२॥ आवडी आईक तूं कानीं । अथवा त्यागुनी वोसंडीं तूं ॥३॥ निळा म्हणे देऊनि बळ । वदवितो कृपाळ विश्वजनिता ॥४॥