नित्य नूतन गाऊं गुण । करुं जागरण कीर्तनीं ॥१॥ तेणें तुमची होईल कृपा । निरसन तापा भवरोगां ॥२॥ जाती खंडोन जन्मांतरें । पुढेंही फेरे खावें तें ॥३॥ निळा म्हणे विश्वास चित्तीं । हाचि श्रीपती मानियेला ॥४॥