नित्य नूतन तुम्ही नवे । आम्हीं तों जिवें वेंचतो ॥१॥ जाणें येणें आम्हा आटी । कल्पकोटीं तुम्हां जिणें ॥२॥ सुखदु:ख आम्हां भोग । तुम्ही तों अनंग निजरुपें ॥३॥ निळा म्हणे जगदाधीशा । आम्ही आशा बांधलों ॥४॥