आनंदमय सर्वकाळ । जडली निश्चळ वृत्ती पायीं ॥१॥ गाईलेची गावे गुण । करावें श्रवण केलेंची ॥२॥ धणी न पुरे घेतलें घेतां । आवडी चित्ता पुढें पुढें ॥३॥ निळा म्हणे न वीटे रसना । तुमचे गुण वाणीतां ॥४॥