नाम वाचे आठविलें – संत निळोबाराय अभंग – ६८२
नाम वाचे आठविलें ।
रुप मनीं सांठविलें ॥१॥
आतां फिरुनियां घरां ।
येशी आपणचि माघारा ॥२॥
लाविला मोकळा ।
भाव मागें सर्वकाळ ॥३॥
निळा म्हणे आतुडलें ।
बरें वर्म हातां आलें ॥४॥
नाम वाचे आठविलें ।
रुप मनीं सांठविलें ॥१॥
आतां फिरुनियां घरां ।
येशी आपणचि माघारा ॥२॥
लाविला मोकळा ।
भाव मागें सर्वकाळ ॥३॥
निळा म्हणे आतुडलें ।
बरें वर्म हातां आलें ॥४॥