न सांडाल तुम्ही आपल्या विहिता । परी मी करितों चिंता मूर्खपणें ॥१॥ रवि केवीं सांडीं आपला प्रकाश ।
अमृता मिठांश जीवविता ॥२॥
परी मी अधीर न धरितां धीर ।
करीं करकर रुसोनियां ॥३॥
निळा म्हणे झाले अपराध ते क्षमा ।
करा पुरुषोत्तमा विनवूं काय ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.