न सांडाल तुम्ही आपल्या – संत निळोबाराय अभंग – ६८१
न सांडाल तुम्ही आपल्या विहिता ।
परी मी करितों चिंता मूर्खपणें ॥१॥
रवि केवीं सांडीं आपला प्रकाश ।
अमृता मिठांश जीवविता ॥२॥
परी मी अधीर न धरितां धीर ।
करीं करकर रुसोनियां ॥३॥
निळा म्हणे झाले अपराध ते क्षमा ।
करा पुरुषोत्तमा विनवूं काय ॥४॥