दुरी ठेलीं कर्माकर्मे – संत निळोबाराय अभंग – ६८०

दुरी ठेलीं कर्माकर्मे – संत निळोबाराय अभंग – ६८०

दुरी ठेलीं कर्माकर्मे ।
तुमच्‍या धर्मे विठोबा ॥१॥
आळवितां मुखीं नाम ।
सकळही काम परिपूर्ण ॥२॥
होतें संचित जोडलें कांहीं ।
ठेविलें पायीं तुमचे तें ॥३॥
निळा म्हणे माझें मज ।
वाटे गुज आतुडलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दुरी ठेलीं कर्माकर्मे – संत निळोबाराय अभंग – ६८०