मध्यें परमात्मा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग ६८
मध्यें परमात्मा श्रीहरी ।
दधिओदन घेऊनि करीं ।
कवळ त्यांचियें मुखों भरी ।
आणि स्वीकारी आपणही ॥१॥
हें देखोनियां चतुराननें ।
परम संकोच मानिला मंने ।
मग म्हणे हें सध्यास्नानें ।
काहींची न करिती गोंवळ ॥२॥
आम्ही याचें शेष घेणें ।
तैं ब्रम्हत्वा मुकणें ।
यज्ञी अग्रपूजेचें आवंतणें ।
कैंचे येईल मग आम्हां ॥३॥
यातें नाही यज्ञाचार ।
दीक्षा अथवा शिखासूत्र ।
आम्ही सोवळे निरंतर ।
करुं उच्चारु वेदाचा ॥४॥
सोंवळें ओेंवळे नाही यांसी ।
केलें अपोषण् कर्मासी ।
सेवितां याचिया उच्छिष्टासी ।
होईल प्रत्यवायासी निजमूळ ॥५॥
प्रायश्चितेंही घेतां ।
न फिटे विटाळ तत्वतां ।
ऐसें विचारुनियां विधाता ।
पालटी तत्वतां ब्रम्हपण ॥६॥
निळा म्हणे ज्याचा तया ।
संदेह बाधी त्या नांव माया ।
मग तो रुप पालटूनियां ।
झाला गोंवळ वेषधारी ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मध्यें परमात्मा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग ६८