ठेवाल तेथें राहेन – संत निळोबाराय अभंग – ६७९

ठेवाल तेथें राहेन – संत निळोबाराय अभंग – ६७९

ठेवाल तेथें राहेन सुखें ।
यावरी हरिखें आपुलिया ॥१॥
न वंची मी हे सेवेसी काया ।
धाडाल ठायां जाईन त्या ॥२॥
दयाल ग्रास तो घालिन मुखीं ।
न करीं आणखी सोस कांही ॥३॥
निळा म्हणे कराल आज्ञा ।
न मोडीं प्राज्ञा तुमची ते ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ठेवाल तेथें राहेन – संत निळोबाराय अभंग – ६७९