जेववाल तेंचि जेवीन मुखें । पांघरवाल सुखें पाघरेन ॥१॥ बैसवाल तेथे बैसेन उगा । निजवाल जागा न सोडीं तो ॥२॥ जैसें कराल मी होईन तैसा । न करुनियां आशा आणिकांची ॥३॥ निळा म्हणे जें कराल तें तें । होईन आज्ञेतें नुलंघीं ॥४॥