जें जें बोलवितां बोल । अर्थ सखोल त्यांमाजीं ॥१॥ आवडीं ऐसें आपुलें देवा । वदवा रंजवा आपणिया ॥२॥ सारुनियां लौकिक लाज । नाचवा भोज कवतुकें ॥३॥ निळा म्हणे कृपातरणी । प्रकाशवाणी करुनियां ॥४॥