जीवें भावें जोडिलें होतें । पूर्व फळा तें आजी आलें ॥१॥ अंगीकार तुम्ही केला । मुखींचा दिधला प्रसाद ॥२॥ अभयदानें सुखी केलें । दाविलीं पाउलें सतेज ॥३॥ निळा म्हणे चरणीं थारा । दिधला किंकरा अनाथ ॥४॥