जीवें भावें जोडिलें होतें – संत निळोबाराय अभंग – ६७५
जीवें भावें जोडिलें होतें ।
पूर्व फळा तें आजी आलें ॥१॥
अंगीकार तुम्ही केला ।
मुखींचा दिधला प्रसाद ॥२॥
अभयदानें सुखी केलें ।
दाविलीं पाउलें सतेज ॥३॥
निळा म्हणे चरणीं थारा ।
दिधला किंकरा अनाथ ॥४॥