आठवितांचि रुप मनीं – संत निळोबाराय अभंग – ६७४
आठवितांचि रुप मनीं ।
जाय कल्पना विरोनी ॥१॥
आतां तूंचि तूं आवघा ।
मी हें नुरे माझिया भावा ॥२॥
बुदबुद आपुला उगम पाहे ।
तंव सिंधूचि होऊनि राहे ॥३॥
निळा म्हणे बोलवा बोली ।
बोला तुम्ही ते आपुंली ॥४॥
आठवितांचि रुप मनीं ।
जाय कल्पना विरोनी ॥१॥
आतां तूंचि तूं आवघा ।
मी हें नुरे माझिया भावा ॥२॥
बुदबुद आपुला उगम पाहे ।
तंव सिंधूचि होऊनि राहे ॥३॥
निळा म्हणे बोलवा बोली ।
बोला तुम्ही ते आपुंली ॥४॥