आणखी उपाय । सांडीयले ते अपाय ॥१॥ तुमच्या नामाविण हरी । नेणों दुजी कांहीं परी ॥२॥ सांगती साधनें । परी तीं वाटतीं बंधनें ॥३॥ निळा म्हणे देवा । जैसी तैसी घ्या हो सेवा ॥४॥