आणखी उपाय – संत निळोबाराय अभंग – ६७२
आणखी उपाय ।
सांडीयले ते अपाय ॥१॥
तुमच्या नामाविण हरी ।
नेणों दुजी कांहीं परी ॥२॥
सांगती साधनें ।
परी तीं वाटतीं बंधनें ॥३॥
निळा म्हणे देवा ।
जैसी तैसी घ्या हो सेवा ॥४॥
आणखी उपाय ।
सांडीयले ते अपाय ॥१॥
तुमच्या नामाविण हरी ।
नेणों दुजी कांहीं परी ॥२॥
सांगती साधनें ।
परी तीं वाटतीं बंधनें ॥३॥
निळा म्हणे देवा ।
जैसी तैसी घ्या हो सेवा ॥४॥