अवघा काळ हेंचि – संत निळोबाराय अभंग – ६७१

अवघा काळ हेंचि – संत निळोबाराय अभंग – ६७१

अवघा काळ हेंचि ध्यान ।
तुमच्या चिंतन नामाचें ॥१॥
करुं देवा हे सूदना ।
ठेवुनी चरणांवरी दृष्टी ॥२॥
गुणचरित्रें श्रवण करुं ।
अर्थ विवरुं मानसीं ते ॥३॥
निळा म्हणे अवघा धंदा ।
कीर्तन गोविंदा तुमचें तें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघा काळ हेंचि – संत निळोबाराय अभंग – ६७१