अमृताहुनि गोड हरी । नाम उच्चारितां वैखरी ॥१॥ घेतां न विटेचि हे रसना । अधिक् अधिक् आवडी मना ॥२॥ चित्तासि विश्रांति । इंद्रियें सुखावलीं ठाती ॥३॥ निळा म्हणे गोडागोड । सेवितां सरे अवघी चाड ॥४॥