अमृताहुनि गोड हरी – संत निळोबाराय अभंग – ६७०
अमृताहुनि गोड हरी ।
नाम उच्चारितां वैखरी ॥१॥
घेतां न विटेचि हे रसना ।
अधिक् अधिक् आवडी मना ॥२॥
चित्तासि विश्रांति ।
इंद्रियें सुखावलीं ठाती ॥३॥
निळा म्हणे गोडागोड ।
सेवितां सरे अवघी चाड ॥४॥
अमृताहुनि गोड हरी ।
नाम उच्चारितां वैखरी ॥१॥
घेतां न विटेचि हे रसना ।
अधिक् अधिक् आवडी मना ॥२॥
चित्तासि विश्रांति ।
इंद्रियें सुखावलीं ठाती ॥३॥
निळा म्हणे गोडागोड ।
सेवितां सरे अवघी चाड ॥४॥