संत निळोबाराय अभंग

तंव पातला माध्यान्हकाळ – संत निळोबाराय अभंग ६७

तंव पातला माध्यान्हकाळ – संत निळोबाराय अभंग ६७


तंव पातला माध्यान्हकाळ ।
गोवळां भुकेची झाली वेळ ।
मग पाहोनियां उत्तम स्थळ ।
सुरुतरु शीतळ छायातळीं ॥१॥
तेथें बैसविल्या पंगती ।
घोंगडी घालूनियां खलती ।
कृष्ण म्हणे गाडियांपगती ।
शिदोया एकत्र कालवूं ॥२॥
गोवळ म्हणती बहुत बरें ।
कृष्णा तुझिया निजकरें ।
होईल अमृतचि तें दुसरें ।
जेवूं आदरें शेष तुझें ॥३॥
नारदें ते ऐकिलें कानीं ।
सांगे सत्यलोका जाउनी ।
ब्रम्हयातें म्हणें चक्रपाणी
आजि ब्रम्हरस वांटितो ॥४॥
देवा जाऊनियां तेथें ।
शेष घ्यावेंजी कृष्णहातें ।
तरी हें पद राहेल निरुतें ।
नाही तरी अल्पायु ॥५॥
कृष्णशेषाचा हा महिमा ।
सांगतां अति निरुपमा ।
पावोनियां निष्काम कामा ।
पद अच्युत सुखप्राप्ती ॥६॥
निळा म्हणे नारदवचनीं ।
ब्रम्हदेव चािलिले तेथुनी ।
पाहाती तंव वृंदावनीं ।
गोवळ नाचती चौफेरीं ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तंव पातला माध्यान्हकाळ – संत निळोबाराय अभंग ६७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *