जाणोनियां मनोभाव – संत निळोबाराय अभंग – ६६७
जाणोनियां मनोभाव । केला सर्व परिपूर्ण ॥१॥ ऐसेचि तुम्ही कृपासिंधु । दीनबंधु सर्वदां ॥२॥ करुनियां कृपादृष्टी । केली वृष्टी अमृतें ॥३॥ निळा म्हणे देउनी वर । मतिविस्तार वाढविला ॥४॥