जाणोनियां मनोभाव – संत निळोबाराय अभंग – ६६७
जाणोनियां मनोभाव ।
केला सर्व परिपूर्ण ॥१॥
ऐसेचि तुम्ही कृपासिंधु ।
दीनबंधु सर्वदां ॥२॥
करुनियां कृपादृष्टी ।
केली वृष्टी अमृतें ॥३॥
निळा म्हणे देउनी वर ।
मतिविस्तार वाढविला ॥४॥
जाणोनियां मनोभाव – संत निळोबाराय अभंग – ६६७
जाणोनियां मनोभाव ।
केला सर्व परिपूर्ण ॥१॥
ऐसेचि तुम्ही कृपासिंधु ।
दीनबंधु सर्वदां ॥२॥
करुनियां कृपादृष्टी ।
केली वृष्टी अमृतें ॥३॥
निळा म्हणे देउनी वर ।
मतिविस्तार वाढविला ॥४॥