जाणतसां जरी अंतरींचें । तरी कां हो वाचे वदवितां ॥१॥ केविलवाणे तुमचे दास । देखतां उपहास होतील ॥२॥ जग निंदय आधीं करा । मग तुम्ही धरा निज करीं ॥३॥ निळा म्हणे ऐशी रीत । नाहींचि शोभत संतांसीं ॥४॥