कोटी जन्म घेईन देवा । करीन सेवा तुमचीच ॥१॥ भक्ति मुक्ति नका आड । घालूं सांकड मज वाटे ॥२॥ काय करुं ते आत्मस्थिति । खंडन करिती भजनाचे ॥३॥ निळा म्हणे राहो ठायीं । विश्वास पायीं तुमचिये ॥४॥