कोटी जन्म घेईन देवा – संत निळोबाराय अभंग – ६६२
कोटी जन्म घेईन देवा ।
करीन सेवा तुमचीच ॥१॥
भक्ति मुक्ति नका आड ।
घालूं सांकड मज वाटे ॥२॥
काय करुं ते आत्मस्थिति ।
खंडन करिती भजनाचे ॥३॥
निळा म्हणे राहो ठायीं ।
विश्वास पायीं तुमचिये ॥४॥
कोटी जन्म घेईन देवा ।
करीन सेवा तुमचीच ॥१॥
भक्ति मुक्ति नका आड ।
घालूं सांकड मज वाटे ॥२॥
काय करुं ते आत्मस्थिति ।
खंडन करिती भजनाचे ॥३॥
निळा म्हणे राहो ठायीं ।
विश्वास पायीं तुमचिये ॥४॥