कांही चमत्कार देखती ।
विश्वासें तरी वाटे प्रीति ॥१॥
ऐसा विपरीत आहे भोळा ।
जाणा येथींचा जी गोपाळा ॥२॥
येहवीं कोणी फुकासाठीं ।
नाम नुच्चारिती ओठीं ॥३॥
निळा म्हणे नारायणा ।
म्हणोनि दाविली सूचना ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.