कांहीं मानदंभासाठीं । नाहीं केली म्यां हे अटी ॥१॥ तुम्ही तों जाणतां अंतर । काय तेथें परिहार ॥२॥ लोकनिंदा वाटे बरी । आम्हां भूषण तें श्रीहरी ॥३॥ निळा म्हणे वहाती करा । वाट पुढें जगदोध्दारा ॥४॥