कांहीं मानदंभासाठीं – संत निळोबाराय अभंग – ६६०
कांहीं मानदंभासाठीं ।
नाहीं केली म्यां हे अटी ॥१॥
तुम्ही तों जाणतां अंतर ।
काय तेथें परिहार ॥२॥
लोकनिंदा वाटे बरी ।
आम्हां भूषण तें श्रीहरी ॥३॥
निळा म्हणे वहाती करा ।
वाट पुढें जगदोध्दारा ॥४॥
कांहीं मानदंभासाठीं ।
नाहीं केली म्यां हे अटी ॥१॥
तुम्ही तों जाणतां अंतर ।
काय तेथें परिहार ॥२॥
लोकनिंदा वाटे बरी ।
आम्हां भूषण तें श्रीहरी ॥३॥
निळा म्हणे वहाती करा ।
वाट पुढें जगदोध्दारा ॥४॥