काय सांगों सुखानंद – संत निळोबाराय अभंग – ६५९

काय सांगों सुखानंद – संत निळोबाराय अभंग – ६५९

काय सांगों सुखानंद ।
झाला अंतरीं तो बोध ॥१॥
भजतां तुम्हांसी विठठला ।
मनीं प्रेमा ओसंडल ॥२॥
नाठवेची कांहीं आतां ।
ऐसा वेध झाला चित्तां ॥३॥
निळा म्हणे ऐशी परी ।
झाली नवलाचि वाटे हरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काय सांगों सुखानंद – संत निळोबाराय अभंग – ६५९