काय द्याल तुम्हीं देवा । घ्यावी सेवा आमुचीच ॥१॥ पूवीपासूनि करीत आलों । कळासलों अभ्यासें ॥२॥ दयाल तें तें अवघें मिथ्या । आम्ही सत्या न संडूं ॥३॥ निळा म्हणे जीवन आम्हां । पुरुषोत्तमा दास्यत्व ॥४॥