कवळूनियां कृपामोहें – संत निळोबाराय अभंग – ६५७

कवळूनियां कृपामोहें – संत निळोबाराय अभंग – ६५७

कवळूनियां कृपामोहें ।
माझे संदेह निरसिले ॥१॥
लांचाविली माझी वाणी ।
आपल्या गुणीं वळुनियां ॥२॥
नाचों शिकवितां पुढें ।
धरुनियां कोडें करकमळीं ॥३॥
निळा म्हणे माझीं गात्रें ।
तुम्हीं सूत्रें चेष्टविलीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कवळूनियां कृपामोहें – संत निळोबाराय अभंग – ६५७