कवण्या योगें तल्लिनता । ऐशी जडोनी ठेली चित्ता ॥१॥ हें मी नेणें गा श्रीपती । तुमची करणी तुम्हां हातीं ॥२॥ बुध्दि इंद्रियांचे कोड । पुरवुनी वाचा केली वाड ॥३॥ निळा म्हणे दिवसरतीं । कळे केव्हां जाती येती ॥४॥