ऐसिये सांपडलों संदीं । सर्वदा व्दंव्दीं काळाचे ॥१॥ कैसी सुटका होईल आतां । न लक्षेचि सत्ता कर्मगती ॥२॥ नैष्कर्म्य ऐसें भासे । परि तें नेतुसे सकामीं ॥३॥ निळा म्हणे देखोनि भ्यालों । म्हणोनि आलों शरण तुम्हां ॥४॥