संत निळोबाराय अभंग

ऐसिया बेगडी नका गोवूं – संत निळोबाराय अभंग – ६५३

ऐसिया बेगडी नका गोवूं – संत निळोबाराय अभंग – ६५३


ऐसिया बेगडी नका गोवूं आम्हांसी ।
अनुसरलों सेवेसी तुमचे नामचिंतनी ॥१॥
नाना मतांतरें त्यांचे अर्थ विपरीत ।
नेऊनियां घालित मुखीं काळाचे सर्व ॥२॥
नाना तर्कवाद भेदबुध्दी जल्पन ।
कैंचें समाधान तेथें दर्शन तुमचें ॥३॥
निळा म्हणे देखोनी ऐसें वाटतसे भय ।
न सोडूं ते पाय तुमचे सांपडले विटे ॥४॥
काय करुं तैसें ज्ञान ।
जेणें अभिमान खवळे तें ॥५॥
राहो भाव तुझया चरणीं ।
गर्जो वाणी अहंकार वाढे ।
न लगे वेडें वैराग्य तें ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसिया बेगडी नका गोवूं – संत निळोबाराय अभंग – ६५३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *