ऐशा परि नमन माझें – संत निळोबाराय अभंग – ६५१

ऐशा परि नमन माझें – संत निळोबाराय अभंग – ६५१

ऐशा परि नमन माझें पंढरीनाथा ।
तूंचि होऊनि तुजमाजि झालों मी सरता ॥१॥
नये कळों कांहीं आतां एकानेक भाव ।
तुज माजीं मीहीं मजमाजि तूं सर्व ॥२॥
नाम रुप तूंचि माझे क्रिया कर्तव्य ।
कायिक वाचिक मानसिक जे निपजती भाव ॥३॥
निळा म्हणे मी तूं उपाधी सारुनियां परती ।
राहों जैसे होतों तैसे निजरुप एकांतीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐशा परि नमन माझें – संत निळोबाराय अभंग – ६५१