एकचि अक्षर वाचेसि येतां । पुढें वाढवितां विस्तारें ॥१॥ कां हे चेष्टविली वाणी । माझी चक्रपाणी मी नेणें ॥२॥ आईता जोडूनियां रस । लावितां सारांश निवडुनी ॥३॥ निळा म्हणे आतां तर जाणा । तुम्ही सुजाणा कृपाब्धी ॥४॥