उगाचि वदवितां कां गा । वाचा माझी पांडुरंगा ॥१॥ कोणा न रुचे ऐकतां । हांसों लागती तत्वतां ॥२॥ म्हणती रचिलें हें पाखांड । सैरा वाजविलें तोंड ॥३॥ निळा म्हणे आतां ठेवा । दिला दयोकार तो हा देवा ॥४॥