इतर साधनीं उपाव – संत निळोबाराय अभंग – ६४६
इतर साधनीं उपाव ।
करिती ते ते आम्हां देव ॥१॥
काय जाणितलें तिहीं ।
पडिले साधनांचे वाहीं ॥२॥
कोण लाभ कैसी गती ।
काय पावती ते अंतीं ॥३॥
निळा म्हणे नेणों आम्ही ।
तुमच्या नामेंविण स्वामी ॥४॥
इतर साधनीं उपाव ।
करिती ते ते आम्हां देव ॥१॥
काय जाणितलें तिहीं ।
पडिले साधनांचे वाहीं ॥२॥
कोण लाभ कैसी गती ।
काय पावती ते अंतीं ॥३॥
निळा म्हणे नेणों आम्ही ।
तुमच्या नामेंविण स्वामी ॥४॥