आंधळिया उगवोनी रवी । न दिसेचि तेंवि मज झालें ॥१॥ तेंवी तुम्ही स्वत:सिध्द हरी । परि मी माझारी भ्रांतीतमा ॥२॥ रोग्यारसने कैंची गोडी । जे ते निवडी रसस्वाद ॥३॥ निळा म्हणे वेडिया गोत । नाढळे धन वित्त दरिद्रिया ॥४॥